Posts

मन आणि खुणा

कधी भरकटते मन तर कधी होते सैरभैर द्यावा लागतो कधी आधार स्वतःच स्वतःला विस्कटलेल्या मनाची कधी घालावी लागते घडी पण मागे तरीही उरतातच चुरगाळल्याच्या खुणा या खुणा जर का बोचल्या तर करून टाकावी त्या सगळ्यांना इस्त्री मग, परत मिळत आपलच आपल्याला कोर करकरीत... मन मला विचाराल तर मात्र ठेवाव्यात या खुणा तशाच आणि बारकाईने त्यांच कराव निरीक्षण निरखावित त्यांची वळणे आणि घ्यावा त्यांचा आढावा करावा सखोल अभ्यास आणि मिळवावी निपुणता फिरून होइल याचा फ़ायदा जाणार नाहीत कष्ट वाया आतुन कधी जाणवेल जेव्हा या सगळ्याची सार्थकता सांगाल मग तुम्ही कधी इतरांना पण हेच आणि मग उगाच लोक म्हणतील "फारच विचारी झालात बुवा" पटो न पटो इतरांना ठेवाल जर हे विचार मनात उतरतील कधी नंतर ते असेच एखाद्या काव्यात...!

# हॅनोवर #

  मी या शहरात आल्यापासुन मला कायम काही ना काही नवीन सापडतं आहे. रोज एक नवा अनुभव. इथे राहत असलेल्या भारतीय लोकांमुळे पण खूप नवीन गोष्टी समजत आहेत. काल मला अशीच एक नवीन गोष्ट कळाली आणि त्याचा अनुभव खूप सुंदर होता. त्याबद्दल थोडेसे…   Hannover मधील "Harrenhausen Gardens" ही युरोपिअन ऐतिहासिक gardens आहेत. कला आणि संस्कृती यांचे अप्रतिम मिश्रण आहे इथे. याचे ४ वेगवेगळ्या प्रकारच्या बागांमध्ये विभाजन होते. "Grosser Garten", "Georgen-garten", "Welfen-garten"  आणि "Berg-garten". यामधील Grosser Garten हा Baroque Garden चा प्रकार आहे. Georgengarten आणि Welfengarten दोन्ही English Gardens च्या शैली मध्ये तयार केले गेले आहेत. तर Berggarten हे एक Botanical garden आहे. अत्यंत अदभुत आणि विशाल अशी वृक्षसंपत्ती आहे या जागेमध्ये. मी जेंव्हा पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा खरंच डोळे दिपून गेले. एका रांगेमध्ये सलग हिरवेगार आणि आकाशाला स्पर्श करणारे वृक्ष बघून खूप आनंद झाला.असा आनंद जो फक्त नैसर्गिक कलाकृती पाहून अनुभवास येऊ शकतो. काही काही वृक्ष तर इतके मोठे ...

आनंद …. !!

        रविवार   सुट्टीचा दिवस , म्हणून सकाळी सकाळी पायीच फिरायला बाहेर पडले . कोकण एक्सप्रेस - कर्वे पुतळा अस करत मृत्युंजयेश्वर च्या मंदिरात गेले .       सकाळी कोणीच नव्हत मंदिरात . फक्त दोन भटजी , साफसफाई करणाऱ्या मावश्या आणि मी . शांतता भरून राहिली होती मंदिरात . एरवी कुणीना - कुणीतरी असतच . जोरात घंटा वाजवून आत शिरले , मनातले विचार पूर्णपणे बाजूला पडलेले आणि फक्त सुरेख सजावट केलेली पिंड दिसत राहिली .    अचानक एक छोटस माऊ च पिल्लू समोर आल आणि जोरात ओरडायला लागल , मी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मग साहजिकपणे त्या माऊपाशी गेले . बहुधा त्याला तहान आणि भूक अस दोन्ही लागली असावी . कारण जेव्हा मी तीर्थ आणि प्रसाद घ्यायला गेले तिथे पण मागे मागे येउन नाजूक आवाजात ओरडून काहीतरी सांगत राहील . मी त्याला २ - ३ साखरफुटाणे दिले , त्याने आनंदात मटकावले . मग अजून थोडे दिले , ते खाऊन त्याने तीर्थाच्या आसपास पडलेले पाणी पण प्यायले . य...

कोलाज

Image
                 अगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजून ही  जपून ठेवली आहेत मी.      खरंच किती सुंदर कल्पना आहे ही की काहीही अर्थ नसलेले वेगवेगळे तुकडे एकत्र करून एक नाविन्यपूर्ण चित्र बनाविणे. आपल आयुष्य पण असंच असत नाही का? वेगवेगळ्या, एकमेकांपासून भिन्न असलेल्या माणसांचं, अनुभवांचं आणि भावनांच एक सुंदर कोलाजच असत की आपलं आयुष्य म्हणजे. एका चित्रकाराच्या दृष्टीकोनातून पाहिले तर ही कल्पना मला जाम भुरळ घालत आहे.       माणूस जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा या चित्राला सुरवात होत असावी. मग जसजसे दिवस, महिने, वर्षे सरतात तसतसे या चित्राला निरनिराळा आकार आणि रंग प्राप्त होऊ लागतात. जितक्या प्रकारची माणसं, तितक्या प्रकारची चित्रं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याप्रमाणे निराळ्या आकाराचे आणि निराळ्...

आठवणींचा पुंजका

आठवणींचा पुंजका कधी विचारतो अवघड प्रश्न तर कधी देतो उत्तर माहित नसलेल्या प्रश्नांची नव्याने सापडतो आपण स्वतःलाच जेंव्हा जेंव्हा येतो पूर - आठवणींचा आणि हा पूर देऊन जातो परत एक आठवण…. एक आठवण…. जिच्यामुळे मिळते मनाला उभारी आणि दुखाला फुंकर आनंदाला गती आणि स्वप्नांना पंख एक आठवण….  असते मिश्रण भावनांचे इंद्रधनुष्याच्या रंगांचे आणि फुलपंखी सुवासाचे एक आठवण…. जी करून देते जाणीव गेलेल्या सुरेख क्षणांची आणि अश्रूंनी भरलेल्या त्या हसऱ्या डोळ्यांची एक आठवण …. कायम सोबत राहणारी हातात हात धरलेल्या एका सखी सारखी एक आठवण …. ~ मानसी