# हॅनोवर #
मी या शहरात आल्यापासुन मला कायम काही ना काही नवीन सापडतं आहे. रोज एक नवा अनुभव. इथे राहत असलेल्या भारतीय लोकांमुळे पण खूप नवीन गोष्टी समजत आहेत. काल मला अशीच एक नवीन गोष्ट कळाली आणि त्याचा अनुभव खूप सुंदर होता. त्याबद्दल थोडेसे…
Hannover मधील "Harrenhausen Gardens" ही युरोपिअन ऐतिहासिक gardens आहेत. कला आणि संस्कृती यांचे अप्रतिम मिश्रण आहे इथे. याचे ४ वेगवेगळ्या प्रकारच्या बागांमध्ये विभाजन होते. "Grosser Garten", "Georgen-garten", "Welfen-garten" आणि "Berg-garten". यामधील Grosser Garten हा Baroque Garden चा प्रकार आहे. Georgengarten आणि Welfengarten दोन्ही English Gardens च्या शैली मध्ये तयार केले गेले आहेत. तर Berggarten हे एक Botanical garden आहे. अत्यंत अदभुत आणि विशाल अशी वृक्षसंपत्ती आहे या जागेमध्ये. मी जेंव्हा पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा खरंच डोळे दिपून गेले. एका रांगेमध्ये सलग हिरवेगार आणि आकाशाला स्पर्श करणारे वृक्ष बघून खूप आनंद झाला.असा आनंद जो फक्त नैसर्गिक कलाकृती पाहून अनुभवास येऊ शकतो. काही काही वृक्ष तर इतके मोठे आहेत कि असं वाटलं खरच त्यांच्यावर चढून ढगात जाता येईल कदाचित.
तर अशा या ठिकाणी "Hannover Veranstaltungs GmbH" नावाची संस्था दरवर्षी "International Firework Competition" आयोजित करते. हि स्पर्धा १९९१ पासून Hannover मध्ये सुरु आहे आणि हे या स्पर्धेचे २५ वे वर्ष आहे. प्रत्येक Summer मध्ये म्हणजे साधारण "मे ते सप्टेंबर" या कालावधी मध्ये हि स्पर्धा चालते. या काळात वेगवेगळ्या देशातील लोक संगीत, नृत्य आणि नाटक यांच्यासोबत अत्यंत आकर्षक अशी आतिषबाजी करतात. आणि या सगळ्यांच्या मिश्रणामधून एक सुंदर कलाकृती निर्माण होते.
यावर्षी हि स्पर्धा ५ देशांमध्ये आहे. Italy, Spain,Finland, The Philippines आणि Sweden. स्पर्धेच्या नियमांनुसार मागील वर्षाच्या विजेत्या पासून नवीन वर्षाच्या स्पर्धेची सुरवात होते. पण या वर्षी या स्पर्धेचे २५ वे वर्ष असल्याने "Sweden" - मागील वर्षाची विजेती Team सर्वात शेवटी सादरीकरण करणार आहेत.
काल, १६.०५.२०१५ ला, या स्पर्धेची सुरवात झाली Itali संघाच्या आतिशबाजीने.…
सध्या इथे खूप उशिरा पर्यंत म्हणजे साधारण ९.३० ते ९.४५ पर्यंत उजेड असतो. त्यामुळेच का काय या स्पर्धेची रचना पण त्यानुसारच असते. संध्याकाळी ६ ला हा कार्यक्रम नृत्य आणि संगीताने सुरु होतो आणि त्याचा शेवट नयनरम्य आतिषबाजीने होतो. आतिषबाजीचा कार्यक्रम फक्त अर्धा तास च चालतो परंतु त्या अर्ध्या तासात डोळ्याचं पारण फिटत. आतिशबाजी Harrenhausen Garden च्या आत मध्ये होते आणि यासाठी वेगळे Ticket असते. काल तिथे बहुधा आख्खे Hannover लोटले असावे. आम्ही मात्र हा कार्यक्रम बाहेरूनच बघितला. या बागेच्या बाहेरून पाण्याचे छोटे तळे आहे. आणि त्याच्या समोर मस्त हिरवळ. इथे पण बरीच गर्दी होती. त्यात काल खूप जोराचा थंड वारा सुटला होता. अनेक लोक तयारीनिशी आले होते. Foldable खुर्च्या, चटया, पांघरूण, खाण्याची आणि त्या बरोबरच "पिण्याची" ही संपूर्ण तयारी केलेली दिसत होती. आम्ही मात्र नुसतेच गेलो होतो. सगळे मिळून १०-१२ जण असू. सगळ्यांनीच थंडीमध्ये कुडकुडत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. शिट्या, टाळ्या आणि जोरजोरात ओरडणे असा देशी प्रकार पाहायला मिळाला आणि पुण्याच्या खूप लांब नसल्याचा उगाचच भास झाला. मला तर दिवाळी ची खूप प्रकर्शाने आठवण झाली. पुढील काही दिवसात अजून काही वेळा हा आनंद अनुभवायला मिळणार आहे आणि मी त्याची आतुरतेने वाट बघत आहे...
ता. क. - मला इथल्या एका भारतीय मैत्रिणी कडून हा कार्यक्रम करण्यामागील अजून एक कारण कळाले आणि मजा वाटली. ती म्हणाली कि म्हणे ही Competition खर तर डांस आणि इतर किड्यांना पळवायला केलेला एक उपाय आहे. इथे Summer मध्ये म्हणजे साधारण मे ते सप्टेंबर मध्ये ऊन -पावसाचा सतत खेळ सुरु असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात. आणि या आतीशाबाजीमुळे होणाऱ्या धुराने ते निघून जातात.
म्हटलं "सही है बॉस" … आवडलं आपल्याला हे … !

Kharach ch " SAHI HAI BOSS " aplyala tar fakt wachun ch awadalay
ReplyDeleteAta pratyaksha Kadhi pahtoy yachi wat Baghtoy
Pan uttam lekhan as always ani हॅनोवर tar hit hai boss