मन आणि खुणा

कधी भरकटते मन
तर कधी होते सैरभैर
द्यावा लागतो कधी आधार
स्वतःच स्वतःला

विस्कटलेल्या मनाची
कधी घालावी लागते घडी
पण मागे तरीही उरतातच
चुरगाळल्याच्या खुणा

या खुणा जर का बोचल्या
तर करून टाकावी
त्या सगळ्यांना इस्त्री
मग, परत मिळत आपलच आपल्याला कोर करकरीत... मन

मला विचाराल तर मात्र
ठेवाव्यात या खुणा तशाच
आणि बारकाईने
त्यांच कराव निरीक्षण

निरखावित त्यांची वळणे
आणि घ्यावा त्यांचा आढावा
करावा सखोल अभ्यास
आणि मिळवावी निपुणता

फिरून होइल याचा फ़ायदा
जाणार नाहीत कष्ट वाया
आतुन कधी जाणवेल जेव्हा
या सगळ्याची सार्थकता

सांगाल मग तुम्ही कधी
इतरांना पण हेच
आणि मग उगाच लोक म्हणतील
"फारच विचारी झालात बुवा"

पटो न पटो इतरांना
ठेवाल जर हे विचार मनात
उतरतील कधी नंतर ते
असेच एखाद्या काव्यात...!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आठवणींचा पुंजका

कोलाज